सामाजिक आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य आणि केंद्र सरकार पर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
कोल्हापूर, पंढरपूरहुन ते आज सोलापूरात पोहचले त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या गायकवाड बेंचने रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खा.छत्रपती संभाजीराजे हे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून त्या निमित्तानं सोलापुरात आले होते. पुढे त्यांचा दौरा तुळजापूर, उस्मानाबादहून नांदेड असा असणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण अमान्य केलेले आहे. यामुळे मराठा समाज दु:खी झाला आहे. मराठा आरक्षणासाठी आता आपल्याला मार्ग काय काढता येईल यासाठीच आपला दौरा असल्याचे खासदार संभाजी राजे यांनी स्पष्ट केले आहे.
आपला दौरा हा मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी असून हा दौरा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आपला राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. खासदार संभाजीराजे यांनी आपल्या या दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरातून केली. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर शहरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिली.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times