मतभेद मान्य करतानाच नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय कुठेही बिघडला नसल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधक हातात कोलीत घेऊन फिरत असले, तरी पण विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नसल्याचे पटोले म्हणाले. सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आधारित असल्याने आमची ही मागणी कायम राहील. कॉमन मिनिममत प्रोग्रामचं पालन होणे महत्वाचे असल्याचे म्हणत त्यांनी हे पालन करण्याचे आवाहन सहकारी पक्षांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये कोणतीही नाराजी नसून सर्वकाही व्यवस्थित सुरु असल्याचेही पटोले म्हणाले. आमच्या सरकारमध्ये लोकशाही जिवंत आहे. मागच्या सरकारसारखी नळावरची भांडणे आमच्यात मुळीच नाहीत असे पटोले म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यात काही दिवसांपूर्वी यूपीएच्या नेतृत्वावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. त्यावर देखील पटोले यांनी भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत आणि माझे काही वैयक्तिक वैर नाही. सरकारमधील प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगतानाच महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times