वाचा:
तालुक्यातील २२ गावे १९७१ पासून पाण्यासाठी झगडत आहेत. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्या शेतकऱ्यांसाठी निरा डाव्या कालव्यातून आणि खडकवासला धरणातून पाण्याची तरतूद करून ऊस लावण्याची परवानगी दिली होती. मग आता ५० वर्षानंतरदेखील इंदापूरचे ते शेतकरी पाण्यासाठी का झगडत आहेत? त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले पाणी गेले कुठे?, असा सवाल संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी उपस्थित केला आहे. यात इंदापूर व सोलापूरकरांचे भांडण लावण्याचे काम बारामतीकरांनी केले असून याची किंमत त्यांना येणाऱ्या काळात मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
वाचा:
दरम्यान, शेतकऱ्यांना घेऊन ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनानंतर शेतकरी नेते व शेतकऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करमाळा तालुक्यातील कोंडारचिंचोली येथेही टायर पेटवून निषेध करण्यात आला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times