पुणे: शहर आणि जिल्ह्यात संसर्गानंतर काळ्या बुरशीच्या आजाराने () डोके वर काढले असून, आजमितीला जिल्ह्यात ५२८ रुग्णांवर सरकारी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘म्युकरमायकोसिस’मुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण येथे उपचार घेत आहेत. ( )

वाचा:

पुणे शहरात एप्रिलपासून ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आढळत आहेत. करोनाच्या उपचारांदरम्यान दिल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी काळ्या बुरशीचा आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरातील सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
पुणे शहर, आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत आतापर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे ५७४ रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी ५२८ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, २१ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. एकूण मृतांमध्ये नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात आठ, ससून रुग्णालयात सहा, तर जिल्हा रुग्णालयात चार आणि बाणेर कोव्हिड रुग्णालयात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:

ससून रुग्णालयात आतापर्यंत २०५ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यापैकी १८९ रुग्ण उपचार घेत असून, १० रुग्ण बरे झाले आहेत. त्या पाठोपाठ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७१, रुबी हॉलमध्ये ३३, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रुग्णालयात ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात ३५ आणि नोबेल रुग्णालयात ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here