इंदूरः मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील मालीखेडी गावात सोमवारी लसीकरण ( ) पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात लाठीचा मार लागल्याने एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. अनेक गावकरी लाठ्या घेऊन पथकावर धावले. यावेळी तहसीलदार आणि लसीकरण पथकातील कर्मचारी आपला जीव वाचवत पळाले. या घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

अफवामुळे गावकऱ्यांचा लस घेण्यास नकार

तहसीलदार अन्नू जैन, विवेक माहेश्वरी आणि टीकाकरण पथक मालीखेडी गावात दाखल झाले. तिथे लस घेण्यासाठी नागरिकांना समजावण्यात येत होते. कारण ते लस घेण्यास तयार नव्हते. यावेळी सचिव विक्रम पंवार, मोहम्मद कुरेशी आणि आंगवणवाडी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता उपस्थित होत्या.

गावकऱ्यांचा तहसीलदारांच्या वाहनावर हल्ला

जमावातून एक व्यक्ती लाठी घेऊन आला आणि त्याने तहसीलदार अन्नू जैन यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी मोहम्मद कुरेशी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्यांच्या डोक्याला लाठीने हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. हल्ला झाल्याने तिथे गोंधळाचं वातावरण होतं.

मालीखेडी गावात लसीकणर शून्य टक्के आहे. अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर गावातील तीन प्रमुख नागरिकांनी लस घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here