उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी, सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांचा यापैकी एक सीबीआयचे नवे संचालक होतील, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. सीबीआयचे संचालक पद हे फेब्रुवारीपासून रिक्त आहेत. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा ३ फेब्रुवारीपासून सीबीआयचे अंतरिम प्रमुख आहेत. विशेष म्हणजे सीबीआय संचालकपदासाठी १९८५ बॅचचे IPS अधिकारी ( ) यांच्या नावाचीही चर्चा झाली. त्यांचे नाव सीबीआय संचालकपदासाठी आघडीवर असल्याचं असं सूत्रांनी सांगितलं. CBI संचालकपदासाठी सरकारकडून कधीही नाव जाहीर होऊ शकते, असं वृत्त IANS ने दिलं आहे.
CBI संचालक पदाचे दावेदार कोण?सुबोध कुमार जयस्वालांचे नाव आघाडीवर
काही सूत्रांच्या माहितीनुसार IPS अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव संचालकपदासाठी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल हे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आहेत. दत्ता पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर जयस्वाल हे २८ फेब्रुवारी २०१९ ला महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक झाले होते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविका आघाडी सरकारशी सुबोध कुमार जयस्वाल यांची पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून मतभेद निर्माण झाले होते. यादरम्यान केंद्र सरकारने सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्युरोपांच्या फैरी झडल्या होता.
हितेश चंद्र अवस्थी
हितेश चंद्र अवस्थी हे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक आहेत. १९८५ बॅचचे IPS अधिकारी हितेश चंद्र अवस्थी यांना यूपीच्या पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी १ वर्षांपूर्वी देण्यात आली होती. त्यांच्याकडे CBI मध्ये काम करण्याचा अनुभवही आहे. २००५ ते २००८ पर्यंत नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) मध्ये ते DIG उपमहानिरीक्ष आणि उपसंचालक होते. २००८ ते २०१३ मध्ये ते CBI मध्ये महानिरीक्षक होते. तसंच दोन वेळा ते यूपीच्या गृह विभागाचे विशेष सचिव होते.
अवस्थी हे उत्तर प्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी टिहरी गढवाल आणि हरिद्वारचे पोलीस अधीक्षक होते. २०१६ मध्ये अतिरिक्त महासंचालकपदावरून महासंचालकपदावर प्रमोशन झालं. डीजीपी मुख्यालय, टेलिकॉम, होमगार्ड्स, अँटी करप्शन ऑर्गेनायजेशन (ACO) आणि आर्थिक गुन्हे आणि तपास शाखेचे महासंचालक होते. २०१७ मध्ये दक्षता विभागाचे महासंचालक झाले होते. ते आता उत्तर प्रदेशचे महासंचालक आहेत.
आर. के. चंद्रा
आयपीएस अधिकारी कुमार राजेश चंद्रा हे सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक आहेत. हे निमलष्करी दल नेपाळ आणि भूतानला लागून असलेल्या भारतीय सीमांचं संरक्षण कतं. बिहार कॅडरमधील १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी चंद्रा हे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सुरक्षा ब्युरोचे संचालक होते. दिल्लीतील जेएनयूमध्ये त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतली आहे. चंद्रा हे ३१ डिसेंबर २०२१ ला सेवा निवृत्त होणार आहेत. पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा करणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)मध्येही चंद्रा यांनी काम केलं आहे.
व्ही. एस. के. कौमुदी
व्ही. एस. के. कौमुदी गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) आहेत. कौमुदी हे आंध्र प्रदेश कॅडरचे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तेय पोलिस संशोधन आणि विकास ब्युरोचे संचालकही होते. ३० नोव्हेंबर २०२२ ला ते निवृत्त होणार आहेत.
अधीर रंजन चौधरींचा आक्षेप
सीबीआय संचालकपदाच्या निवडीसाठी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बैठक झाली. ही बैठक ९० मिनिटं चालली. या बैठकीत अधीर रंजन चौधरी यांनी अधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. प्रक्रिया ज्या प्रकारे राबवली जात आहेत ती समितीच्या बहुमताच्या विरोधात आहेत. ११ मे रोजी आपल्याला १०९ नावं देण्यात आली होती. सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत १० नावं आणि ४ वाजेनंतर निवडण्यात आलेली ६ नावं देण्यात आली, असं म्हणत अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times