अमरावती: करोनामुळे संचादबंदी जाहीर करण्यात आली असताना जंगलातून इंधन गोळा करण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींचे एकापाठोपाठ मृतदेह आढळल्याने एकलविहीर गावात मोठी खळबळ माजली आहे. बापूराव आहाके (५५) व श्यामराव कुसराम (६०) अशी मृतकांची नावे आहेत. एक मृतदेह रविवारी, तर दुसरा सोमवारी (दि. २४) आढळल्याने घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या घटनेमुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच, इंधन गोळा करण्याासाठी जंगलात जाणाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मृतक बापूराव आहाके हे डिसेंबरमध्ये घरातून निघून गेले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी शेंदुरजनाघाट पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यांचा शोध लागला नाही. शेवटी कुटुंबियांनी पोलिसांची परवानगी घेत बापूराव आहाके यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तरीही त्यांच्या शोध लागला नव्हता.

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास एकलविहिरच्या जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरांना बापुरावांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीती आढळून आला. मजुरांनी या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना दिली. पोलिस व वनविभागाचे कर्मचारी यांनी संयुक्त पंचनामा करुन जागेवरच शवविच्छेदन केलं.

जंगलात मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच चार दिवसांपासून बेपत्ता असलेले शामराव कुसराम यांचाही मृतदेह जंगलात सापडला आहे. सोमवारी कुसराम यांचा मृतदेह एकलविहीरच्या जंगलात आढळून आला आहे. त्यामुळं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here