अहमदनगर: वादाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे नगर येथील भिंगार येथे कीर्तनासाठी शनिवारी आले होते. यावेळी यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. बाउन्सरच्या कड्यामध्येच ते कीर्तनस्थळी आले. वादाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कीर्तन चालू असताना शूटिंगलाही बंदी करण्यात आली.

वाचा: वाचा:

समतिथीला मुलगा व विषम तिथीला मुलगी, असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच शनिवारी भिंगार येथे श्री शुक्लेश्वर मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. महाराजांचे कीर्तन होणार का नाही, याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, इंदुरीकर आले. त्यांच्यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. गाडीतून उतरल्यानंतर ‘बाउन्सर’नी त्यांच्याभोवती कडे केले. त्या सुरक्षेतच त्यांना कीर्तनस्थळी आणण्यात आले. त्यानंतर सर्वात आधी कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे काढण्यास सांगण्यात आले. जोपर्यंत हे कॅमेरे काढण्यात येणार नाही, तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही, अशी सूचनाही आयोजकांनी दिली. अखेर कॅमेरे काढल्यानंतर कीर्तन सुरू करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

वाचा:
वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here