”जवळील व टग बोटीतील कर्मचाऱ्यांची शोधमोहीम १५० तासांनंतर जवळपास थांबली आहे. नौदलाच्या सर्व नौका मुंबईतील तळाकडे परतल्या आहेत. तटरक्षक दलाच्या काही नौका अद्यापही तेथे आहेत. पण त्यादेखील लवकरच परत येणार आहेत.
‘मुंबई हाय’जवळच्या ओएनजीसीच्या इंधन विहिरीजवळ बार्ज बुडून २६१ कर्मचारी संकटात सापडले होते. त्यातील १८६ जणांना वाचवण्यात व तटरक्षक दलासह अन्य नौकांना यश आले होते. मात्र उर्वरित कर्मचारी बेपत्ता होते. त्यातील ७० कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले. याच परिसरात ‘वराप्रदा’ टग बोटदेखील बुडाली होती. त्यात १३ कर्मचारी होते. त्यातील दोघांना वाचवता आले. उर्वरित कर्मचारी बेपत्ता होते. या सर्वांचा शोध सुरू असतानाच आठ मृतदेह रायगड जिल्ह्यात, तर आठ गुजरातच्या किनारपट्टीवर सापडले. यानुसार सर्व कर्मचाऱ्यांचा शोध लागला. त्यामुळे ही मोहीम आता संपुष्टात आली आहे.
याबाबत नौदल सूत्रांनी सांगितले की, या शोध व बचाव मोहिमेसाठी नौदलाच्या पाच युद्धनौका, दोन गस्ती नौका व एक कॅटामरान श्रेणीतील नौका कार्यरत होत्या. यापैकी आयएनएस सुभद्रा ही गस्तीनौका वगळता उर्वरित सर्व नौका तळावर परतल्या आहेत. नौदलाने ही मोहीम आता तटरक्षक दलाकडे सोपवली आहे. यापुढील लक्ष्य आता प्राणवायू आणण्याच्या समुद्रसेतू या मोहिमेवर असेल. दरम्यान, कॅटामरान श्रेणीतील ‘आयएनएस मकर’ या नौकेने ‘वराप्रदा’ या टगचादेखील सोमवारी शोध लावला. या नौकेवरील अत्याधुनिक सोनार रडारच्या सहाय्याने हा शोध लावण्यात आला.
‘आयएनएस तर्कश’ने आणला ४० टन प्राणवायू
‘समुद्रसेतू-२’अंतर्गत ‘आयएनएस तर्कश’ या फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौकेने ४० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू आणला. प्रत्येकी २० मेट्रिक टनाच्या दोन कंटेनरसह ७६० ऑक्सिजन सिलिंडर व दहा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्सचा त्यात समावेश आहे. ही सामग्री बहारिनहून आणली गेली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
cheapest propecia In postmenopausal women, AIs cause relatively rapid decreases in circulating estrogen