मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटू लागलं आहे. भारतीय जनता पक्षानंही या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरण्याची तयारी चालवली आहे. यापुढं मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचं भाजपनं जाहीर केलं आहे. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढं निघणाऱ्या प्रत्येक मोर्चात पक्षाची ओळख बाजूला ठेवून सहभागी होऊ, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी काल पुण्यात जाहीर केलं. पंतप्रधान हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजेंना न भेटल्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे. त्यावरही पाटील यांनी काल खुलासा केला होता. ‘ हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याचं वाटल्यानं पंतप्रधान मोदी हे संभाजीराजेंना भेटले नाहीत’, असं ते म्हणाले होते. या खुलाशावरून काँग्रेसचे प्रवक्ते यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

वाचा:

‘प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन मोदींना भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे,’ असं सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. हे ट्वीट करताना सावंत यांनी मोदी आणि सेलिब्रिटींच्या भेटीचे फोटोही ट्वीट केले आहेत.

वाचा:

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here