गडचिरोली: मुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्रात सोमवारी २४ मे रोजी निदर्शनास आला. याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे. (Bodies of Coronavirus Victims Interchanged at Covid Centre)

वाचा:

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्रात राघोबा भोयर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांचा मृतदेह सकाळी दहा वाजता देण्यात येईल, असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानुसार नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी कोविड केंद्रात गेले असता, मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. भोयर यांचा मृतदेह कोणतीही चौकशी न करता सकाळी आठ वाजताच खासगी वाहनाने सिरोंचाकडे पाठविला तर, सिरोंचा येथील व्यक्तीचा मृतदेह गडचिरोलीतच ठेवण्यात आला. या प्रकारामुळे दुःखात असलेल्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. सदर प्रकार नातेवाईकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर भोयर यांचा मृतदेह दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कोविड केंद्रात परत आणण्यात आला.

या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मृतकाच्या मुलगा स्वप्नील भोयर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here