मुंबई: करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुकारलेल्या लॉकडाऊनची मुदत येत्या ३१ मे रोजी संपत आहे. त्यामुळं १ जूनपासून नेमकं काय होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेल्या लोकल ट्रेनबाबत सरकार काय निर्णय घेणार याविषयी लाखो मुंबईकरांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं राज्य सरकारकडं महत्त्वाची मागणी केली आहे. ()

वाचा:

‘ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल, त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस यांनी केली आहे. तसं ट्वीट त्यांनी केलं आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्यात कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. मुंबईत विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन मुंबईतील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. इतर काही शहरांतही अशीच परिस्थिती आहे. मात्र, १४ ते १५ जिल्ह्यातील रुग्णवाढ अद्यापही कायम आहे. त्यामुळं हे जिल्हे सोडून इतरत्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

वडेट्टीवार यांनी दिलेल्या संकेतांनंतर संदीप देशपांडे यांनी लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. मुंबई लोकल सध्या सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे बंद आहे. मंत्रालय, महापालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. तर, चाकरमान्यांना कार्यालयं गाठण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेची ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे. ती मान्य झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here