सोलापूर: ‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’ या पोलीस दलाच्या घोष वाक्यालाच काळिमा फासणारी घटना सोलापूरात घडली आहे. शहर पोलीस दलातील एका पोलिसाने आपला सहकारी असलेल्या पोलीस मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी या पोलिसांविरुद्ध पीडित पोलीस पत्नीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला आहे.

शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पोलीस दलातील एका पोलिसाला करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला उपचारांसाठी पोलीस मुख्यालयातील करोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना मित्राच्या असहाय्यतेचा फायदा मित्रानं घेतला.

वाचाः

फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला त्याचाच मित्र पोलीस शिपाई रवी मल्लिकार्जुन भालेकर हा २३ मेच्या मध्यरात्री १२ वाजता सहकारी मित्राच्या घरी गेला आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. यावेळी त्याने सहकारी पोलीस मित्राच्या पत्नीला माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत हा लैंगिक अत्याचार केला आहे. त्यामुळे सोलापूर शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. आरोपीला शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पोसईतळे अधिकचा तपास करीत आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here