अहमदनगरः राज्यात करोनाचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी, मेहनत घेत असताना लोकप्रतिनिधीही मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा करोना काळातील कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत असताना. आता राष्ट्रवादीचे आमदार यांचाही कोविड सेंटरमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रोहित पवार कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी गेले असता सैराट या चित्रपटातील गाण्यावर त्यांनी ठेका धरला. एरवी राज्य आणि देश पातळीवरील राजकारण आणि अन्य विषयांवर भाष्य करणाऱ्या रोहित पवारांना रुग्णांसोबत ठेका धरताना पहताना आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला पवार यांनी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर दिला. त्यावेळी तेथे मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच मनोरंजन व्हावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. कोविड सेंटरमध्ये सैराट चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत. या गाण्यावर ८० वर्षांच्या आजींनीही झिंगाटच्या गाण्यावर ठेका धरला आणि आमदार रोहित पवारांनीही त्यात सहभाग घेतला.

रोहित पवार यांनी ट्वीट केला व्हिडिओ

रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात म्हटलं आहे की, गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या झिंगाट गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here