म. टा. प्रतिनिधी,

पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावातील कॅनॉलमध्ये मंगळवारी सकाळी एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, सोमवारी रात्री एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती असून, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

वाचा:

फुरसुंगी येथे कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची वर्दी लोणी काळभोर पोलिसांनी अग्निशमन दलाला सोमवारी सकाळी दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले. जवान आणि परिसरातील कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनी महिलेचा मृतदेह देखील बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शिंदेवाडीतील महिलेचा मृतदेह

हडपसर परिसरातील शिंदेवादी येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रात्री महिलेचा शोध घेतला होता. मात्र, महिला सापडली नव्हती. मंगळवारी सकाळी फुरसुंगी येथे महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शिंदेवाडीच्या घटनेतील महिलेच्या नातेवाईकांना कळवले. त्यांनी ओळख पटवल्यानंतर तीच महिला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here