मुंबई: आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होऊ लागल्यानंतर आता धनगर समाजाचे नेतेही सक्रिय झाले आहेत. येत्या ३१ मे रोजी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी आरक्षणाचा जागर करण्याचं आवाहन भाजपचे आमदार यांनी समाजाला केलं आहे. ( On )

वाचा:

पडळकर यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ‘धनगर समाजातील अनेक नेत्यांनी आजवर आरक्षण लढ्याचं नेतृत्व केलं आहे. २०१८ साली आपण अखेरच्या लढ्याला सुरुवात केलीय. त्याला समाजातील सर्वांची साथ लाभली. या लढ्याची दखल घेऊन तेव्हाच्या फडणवीस सरकारनं आदिवासींच्या धर्तीवर धनगरांना लाभ देण्याचे मान्य केले. न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं. धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गाचा दाखला मिळेपर्यंत १ हजार कोटींची आर्थिक तरतूद फडणवीस सरकारनं केली. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून यातील एकही योजना लागू केलेली नाही किंवा एकही रुपया धनगर समाजासाठी खर्च केलेला नाही. या महाविकास आघाडीच्या गड्यांना ३१ मे रोजी हादरा द्यायचा आहे,’ असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

‘राज्यात व देशात करोनाची प्रचंड लाट आहे. परिस्थिती बिकट आहे. दरवर्षी ३१ मे रोजी आपण चौंडी येथे अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहत असतो. या वर्षी आपल्या एकत्र येता येणार नाही. त्यामुळं आपण वेगळ्या पद्धतीनं अहिल्यादेवींची जयंती साजरी करायची आहे. ३१ मे रोजी मी चौंडी येथे दर्शनास जाणार आहे. तो कार्यक्रम लाइव्ह करणार आहे. त्यावेळी आपण सर्वांनी पारंपरिक पोषाखामध्ये आपापल्या घरी अहिल्यादेवींना अभिवादन करून जयंती साजरी करावी. पिवळा फेटा व खांद्यावर घोंगडं घ्यावं. महिलांनाही पारंपरिक पेहराव करायला सांगावा व तो फोटो शेअर करावा. आपल्या एकजुटीची ताकद महाविकास आघाडीच्या सरकारला कळली पाहिजे. सरकारला हादरा बसला पाहिजे. त्यामुळं सर्वांनी या जागरात सहभागी व्हा,’ असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here