भटेवरा आणि आयझॅक हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार मानले जातात. याची कुणकूण लागल्यानंतर इडीने हा छापा टाकल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या टीम या संदर्भातील कागदपत्रे खंगाळत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या विरोधात प्राथमिक तपास करून त्या आधारावर 21 एप्रिलला सीबीआयच्यादिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात महाराष्ट्रातील अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने सीबीआयने यापूर्वी मुंबई आणि नागपूर येथील त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर छापे टाकले होते. सीबीआयने या तपासात मनी लॉन्ड्रिंगचीही शंका व्यक्त केली होती. त्याचा छडा लावण्यासाठी सीबीआयने ही माहिती सक्तवसुली संचालनालयाला दिली.
याच आधारावर या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना याप्रकरणी लवकरच चौकशी करता पाचारण केले जाण्याची शक्यता बळावली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times