वाचा:
‘छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही काही कथा, कांदबऱ्या व अन्य पुस्तकांच्या माध्यमातून केले जात आहे. आता पुन्हा एकदा असाच बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे तमाम मराठी जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही याची सरकारनं नोंद घ्यावी आणि ‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी,’ असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी म्हटलं आहे.
वाचा:
गिरीश कुबेर यांनी याच पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशव्यांसोबत केली आहे. यातून कुबेरांना नेमके काय साध्य करायचे आहे? पुस्तकात वादग्रस्त, बदनामीकारक मजकूर छापून पुस्तकाची विक्री जास्त व्हावी हा लेखकाचा उद्देश असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. याआधीही महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांबद्दल असेच आक्षेपार्ह व बदनामीकारक लिखाण करण्यात आले होते. अशा लिखाणातून दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारनं याची तात्काळ दखल घ्यावी, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times