‘आपल्या शाळांमध्ये परदेशी इतिहास शिकवण्याची स्पर्धा असते. खरंतर महाराष्ट्रानं, देशानं मोठा इतिहास घडवलेला आहे. तो इतिहास नव्या पिढीला शिकवा’, असं आवाहन प्रमुख यांनी आज केलं.
‘मेस्टा’ या इंग्रजी संस्थाचालकांच्या अधिवेशनाचं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी स्वदेशी इतिहासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज राज यांनी यावेळी व्यक्त केली. ‘आमच्याकडं पाचवा हेन्री शिकवतात. पाचव्या हेन्रीनंतर कोण झालं? सहावा हेन्री. दुसरं काय होणार?, असं पु. ल. देशपांडे म्हणायचे. इंग्रजी माध्यमाचे आहोत म्हणून आपल्या इतिहासाला हात लावायचा नाही असं करू नका,’ अशी विनंतीही त्यांनी केली.
वाचा:
‘विद्यार्थ्यांच्या रूपानं कच्ची माती आपल्याकडं येते. त्यातून शिल्प घडवण्याचं काम आपलं असतं. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असल्यानं मला त्याचा अनुभव आहे. तुमच्याकडूनही तेच होणं अपेक्षित आहे. प्रत्येक गोष्ट पाठ्यपुस्तकात असायलाच पाहिजे असं नाही. इतर गोष्टींतून विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवता येऊ शकतं. हा विचार इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून व्हायला हवा. तसं झाल्यास खूप मोठं काम होईल. तुमच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी यापुढं भारताचा, हिंदुस्तानचा, महाराष्ट्राचा संस्कार घेऊन मोठे होतील, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times