औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी टीव्हीवर येऊन रडू नये, आता तर त्यांचे भक्तही ऐकणार नाहीत अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ()यांनी मोदींवर टीका केली आहे. खरंतर, करोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहताना मोदींनी शोक व्यक्त केला होता. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावर विरोधकांनी मोदींना निशाणा केला होता.

जेव्हा देशामध्ये लाखोंच्या संख्येनं मृत्यू होत होते. लोक रडत होते, तेव्हा मात्र मोदी निवडणुका आणि प्रचारांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे आता रडण्याचं काही कारण नाही. आता पंतप्रधानांचं तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. आता त्यांचे भक्तही त्यांचं ऐकणार नाही असं इम्तियाज जलील म्हणाले.

‘आता कितीही कारवाई करा, १ जूननंतर आम्ही दुकानं उघडणारच’
दरम्यान, आता सरकारने कोणतीही कारवाई केली तरी आम्ही 1 जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा थेट इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे हे फक्त टीव्हीवर येतात आणि ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या हिताचा काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे, पण आम्ही १ जूननंतर दुकानं उघडणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

इतकंच नाहीतर, दुकानदारांचे हप्ते आणि व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात यावं. नाहीतर आम्ही लॉकडाऊन असला तरी तो झुगारून दुकानं उघडू अशा थेट इशारा यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here