ठाणे : ठाण्यात एका शिवसेना नगरसेवकाने आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात दारू वाटपाचा कार्यक्रम राबवला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. या सगळ्यावर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेना आमदाराच्या कार्यालयात मद्यवाटप म्हणजे आनंद दिघेसाहेबांच्या विचारांना तिलांजली, असे म्हणत निरंजन डावखरे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. खरंतर करोनाच्या जीवघेण्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आरोग्य ते आर्थिक असा संघर्ष सुरू आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. असं असताना नेतेमंडळी दारू वाटपाचा कार्यक्रम राबवत असतील तर ही खूप शर्मेची बाब आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील ही घटना आहे. इथे शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात हा दारू वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या सगळ्यावरून विरोधक आणि काही समाजसेवकांनी या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here