सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे मराठा समाज खुल्या प्रवर्गात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही आता मराठा समाजाला ईडब्ल्यूएसअंतर्गत आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र, आता सुमारे २० दिवसांचा काळ होत आला तरी देखील या मागणीवर कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले गेले नाही. याच कारणामुळे म्हणजेच सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात आपण मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे, असे मेटे यांनी सांगितले. ज्यांना कोणतेही आरक्षण मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी १० टक्के आरक्षण दिले आहे. यात मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आमची मागणी होती. मात्र सरकार यावर काहीच करत नसल्याचे दिसत असल्याचे मेटे म्हणाले.
आता नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, तसेच विविध कोर्सेसना प्रवेश सुरू होणार आहेत. हे लक्षात घेता लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण, तसेच राज्याच्या सचिवांनी नोटिसा काढाव्यात अशी मागणी आम्ही याचिकेत करत असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मेटे ५ जूनला काढणार मोर्चा
मराठा समाजाला न्याय मिळावा या उद्देशासाठी विनायक मेटे येत्या ५ जून रोजी बीडमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा करोनाच्या काळात काढण्यात येत असल्याने करोनाचे सर्व नियम पाळूनच हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मेटे म्हणाले. मोर्चेकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times