सांगली : करोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यात ( District) १९ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते २६ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात १ जूनपर्यंत नवे निर्बंध जारी केले आहेत.

नव्या निर्बंधांनुसार, २६ मे पासून जिल्ह्यात जमाव बंदी आणि संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसंच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील.

कोणत्या अत्यावश्यक सेवांना असेल परवानगी?
१. रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.
२. व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, ॲनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स.
३. दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरु राहतील. घरपोच दूध वितरणास परवानगी असेल.
४. किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देणेस परवानगी असेल. सदर दुकानांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू / सेवा देणेसाठी किंवा पार्सल देणेसाठी मनाई करणेत येत आहे. त्यामुळे सदर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत.
५. पशुखाद्य विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देणेस परवानगी असेल.
६. शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा सकाळी ७ ते ११ सुरु राहतील.
७. शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.
८. शीतगृहे व गोदाम सेवा.
९. स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम.
१०. स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा.
११. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे विहित केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा.
१२. भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज (stock exchanges), डिपॉजिटर्स (Depositories) व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स (Clearing Corporations) व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट.
१३. टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा.
१४. वस्तूंची वाहतूक
१५. पाणीपुरवठा सेवा.
१६. ई – व्यापार ( फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी ).
१७. प्रसार माध्यमे (Media).
१८.पेट्रोल / डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, मालवाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील.
१९. सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा.
२०. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज सुरु राहतील. तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकानधारकांनी सरळ गॅरेज मध्ये करणेस परवानगी असेल. स्पेअरपार्ट ची दुकाने सुरु ठेवणेस प्रतिबंध असेल.
२१. शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा.
२२. विद्युत व गॅस पुरवठा सेवा.
२३. ATMus.
२४. टपाल सेवा.
२५. लस / औषधे / जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाउस एजंट (Custom House Agent) / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (Multi Modal Transport Operators) .
२६. कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging meterial) ची उत्पादन केंद्रे.
वर नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी करून घेणाऱ्या संस्थांनी खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.
१. सर्व अंमलबजावणी प्राधिकरण / संस्था यांनी ही बाब लक्ष्यात घ्यावी की, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध / निर्बंध नसून सदरचे निर्बंध / प्रतिबंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत.
२. यामध्ये नमूद केलेल्या सर्व सेवांची वाहतूक ही वर नमूद १ (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
३. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळकाळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील.
या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खाली निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
अ. संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारी व ग्राहक हे कोव्हीड u १९ च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.
ब. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी.
क. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर रु.५००/- इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड-१९ विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर रु.१०००/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड- १९ साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना / दुकान बंद केले जाईल.
ड. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद १(ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
इ. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.

जिल्ह्यात कोणती दुकाने पूर्णपणे बंद राहणार?
– व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
-उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट बंद राहतील.
-भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील.
-कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहतील.
– वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापनाबंद राहतील
-मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री
-रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here