मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रोजच्या नव्या बाधित रुग्णांची संख्येत घसरण होत असल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. २४ तासांत राज्यात २४ हजार १३६ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत असून ती आज ३ लाख १४ हजार ३६८ वर आली आहे. (maharashtra registered 24136 new cases in a day with 36176 patients recovered and 601 deaths today)

आज राज्यात एकूण ६०१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होतेय घट

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख १४ हजार ३६८ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण ४५ हजार ६४८ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २७ हजार ८५५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या २३ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या १४ हजार ५५६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ७९३ इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये १३ हजार ८८५ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ५ हजार ९९२, नांदेडमध्ये ही संख्या ३ हजार ७६८ इतकी आहे. जळगावमध्ये ७ हजार ४८३, तसेच तर रायगडमध्ये एकूण ५ हजार ४७७ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ८ हजार ६५५, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ५१७ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९७५ इतकी आहे.

२६,१६,४२८ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख २६ हजार १५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २० हजार ८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here