म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या फुलगाव फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ ट्रीपलसीट दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिनही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली.विवेक सुनील पाटील (वय १७), देवानंद सोपान पाटील (वय १६) आणि तुषार राजेंद्र पाटील (वय १७) अशी या भीषण अपघातात ठार झालेल्या तिन्ही तरुणांची नावे आहेत. (three youths lost lives in a district)

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी असलेले विवेक, देवानंद आणि तुषार हे तिघे मित्र मंगळवारी सकाळी कामानिमित्त भुसावळ येथे आले होते. भुसावळातील काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने (एमएच १९ यू ७८६३) घरी तळवेलला परत जात होते. महामार्गावर फुलगाव फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तिघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. यात तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विवेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेले देवानंद व तुषार या दोघांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्यांचा देखील रुग्णालयात उपचार सुरु करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

क्लिक करा आणि वाचा-

तळवेल गावावर पसरली शोककळा

या घटनेमुळे तळवेल गावावर एकच शोककळा पसरली आहे. गावातील तीन तरुण अपघातात ठार झाल्याने गावात एकही चूल पेटली नाही. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here