सुबोध कुमार जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबई माजी पोलिस आयुक्तही आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून त्यांचे आणि ठाकरे सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले. सरकारच्या काही निर्णयामुळे जयस्वाल हे काहीसे नाराज होते. अशातच केंद्र सरकारने त्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ( CISF ) महासंचालकपदी नियुक्ती केली होती.
सबीआयच्या संचालकपदाच्या शर्यतीत सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासोबतच आणखी तीन अधिकारीही स्पर्धेत होते. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी, सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांची नावं चर्चेत होती. सीबीआयचे संचालक पद हे फेब्रुवारीपासून रिक्त आहे. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा ३ फेब्रुवारीपासून सीबीआयचे अंतरिम प्रमुख आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times