राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येत घट होत असून रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला आहे. मात्र, असे असले तरी मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन शिथील होईल का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, मात्र ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय होऊ शकतो असे अस्लम शेख यांनी सांगितले.
असे असले तरी राज्यातील हॉटेल्स, उद्योगधंदे, सलून आणि इतर व्यवसायिकांना दिलास देण्याबाबत टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील, अशी माहिती शेख यांनी दिली.
राज्य शासन तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचेही अस्लम शेख यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक कोविड सेंटरमध्ये बालचिकित्सा गृह आरक्षित करण्यात येत असल्याचे शेख म्हणाले. याबरोबरच ब्लॅक फंगस, यलो फंगससंदर्भात दक्षता घेऊन उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे उघडला जाणार नाही, मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबतची नियमावली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केली जाईल असेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी देखील आपण करोनाविरोधातील लढाईला पूर्णपणे यश आलेले नाही. तिसरी लाट येणार आहे आणि तिचा लहान मुलांवर परिणाम होणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. करोनाचा धोका अजूनही टळला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ‘माझा डॉक्टर’ या कार्यक्रमात म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात करोना संसर्गाची काय परिस्थिती असेल त्यावर लॉकडाऊन उठवायचा की पुढे वाढवायचा हे ठरणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times