मुंबई: ज्येष्ठ पत्रकार () यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’(: The Unwritten Story of the Making of Maharashtra) या पुस्तकाचा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री यांनी जाहीर निषेध केला आहे. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे, असेही राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करत कुबेर यांचा निषेध केला आहे. राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘लोकसत्ताचे संपादक श्रीयुत गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो.

त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख वाटत आहे, असेही राणे यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केले आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- संभाजीराजेंनी केली कुबेर यांच्या या पुस्तकावर बंदीची मागणी

खासदार संभाजीराजे यांनी कुबेर यांच्या या पुस्तकावर राज्यात तत्काळ बंदी घालावी अशी मागणी केली आहे. अशा प्रकारचे लिखाण आपण कसे काय खपवून घेतो, असे म्हणतानाच सरकारने या पुस्तकावर आजपर्यंत बंदी कशी आणली नाही, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी नांदेडमध्ये आल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. असे पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here