म. टा. प्रतिनिधी,

बजाजनगर येथील ममता मेमोरियल हॉस्पिटलला असलेली डेडीकेटेड कोविड केअर सेंटर बाबतीत प्राप्त तक्रारीच्या चौकशीअंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हॉस्पिटलीची कोविड केअर सेंटरची मान्यता रद्द केली आहे. सध्या करोना साथरोगामुळे आंतररुग्ण म्हणून भरती असलेल्या रुग्णांचे पूर्ण उपचार करुन नंतरच सुट्टी द्यावी. तसेच २५ मे नंतर हॉस्पिटलमध्ये कोणत्याही नवीन करोना रुग्णास आंततरुग्ण म्हणून दाखल करण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले आहेत. ( in bajaj nagar of finally derecognized after inquiries)

ममता हॉस्पिटलविरोधात रुग्ण न्याय हक्क परिषद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यता रद्द करणेबाबत तक्रार दाखल केली होती. कोविड हेल्थ सेंटर चालु करतांना लागणाऱ्या आवश्यक परवानग्या नसताना बेकायदेशीरपणे हॉस्पिटल सुरू होते. गोरगरीब रुग्णांची लाखो रुपयांची लूट करीत आहे व नियमाप्रमाणे पैसे न घेता मनमानी करुन रुग्णांकडून बिल घेत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.

क्लिक करा आणि वाचा-
तक्रारींची चौकशी करण्यासाठी डॉ. जी.एम. कुडलीकर, डॅॉ. विजयकुमार वाघ, डॉ. प्रशांत दाते, डॉ. बामणे यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. ह्या समितीने चौकशी करुन अहवाल प्रशासनास सादर केला. अहवालाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरची मान्यता रद्द केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here