वाचा:
शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एका ठिकाणी म्हणजेच १५ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असतील. या केंद्रांवर फक्त दुसराच डोस दिला जाईल. २८ एप्रिलपूर्वी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जाईल. एकूण १०१ केंद्रांवर ‘कोव्हिशील्ड’ लस उपलब्ध असेल. यापैकी दहा केंद्रांवर ८० टक्के लस ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स यांच्या पहिल्या डोससाठी वापरली जाईल. उर्वरित लस ही पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना दिली जाईल. २० मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेले नागरिक यासाठी पात्र असतील.
वाचा:
शहरातील ९० केंद्रांवर उपलब्ध लशींपैकी ६० टक्के डोस ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी असतील. यासाठी सकाळी आठ वाजता अपॉइंटमेंट घेता येईल. वीस टक्के डोस थेट केंद्रावर येणाऱ्या (वॉक-इन) नागरिकांसाठी राखीव असतील. उर्वरित २० टक्के डोस हे पहिल्या डोसनंतर ८४ दिवस पूर्ण झालेल्या (दोन मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्या) नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी राखीव असतील. या लसीकरण केंद्रांची यादी महापालिकेसह महापौरांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तसेच punevaccination.in या वेबसाइटवर उपलब्ध असेल.
वाचा:
मंगळवारी ४८५५ नागरिकांना लस
मंगळवारी शहरात फक्त खासगी लसीकरण केंद्र सुरू होती. या केंद्रांवर मिळून ४८५५ नागरिकांनी लस घेतली. यात १८ ते ४४ वयोगटातील ४२०८ नागरिकांनी पहिला डोस घेतला. ४५ ते ९० मधील १२९ नागरिकांनी दुसरा तर ४०० नागरिकांनी पहिला डोस घेतला. ६० वर्षांपुढील एकाही नागरिकाने दुसरा डोस घेतला नाही. तर ११५ नागरिकांना पहिला डोस मिळाला. अवघ्या एका फ्रंटलाइन वर्करला दुसरा तर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times