नवी दिल्ली : यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आणि पश्चिम बंगालसहीत अनेक राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी दबावक्षेत्रात चक्रीवादळानं भीषण स्वरुप धारण केलं.
LIVE अपडेट :
- ओडिशा : यास चक्रीवादळाचं तांडव सुरू झालंय. ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात वेगाच्या वाऱ्यांसोबत मुसळधार पाऊस सुरू आहे.
- आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यांच्या भागात चक्रीवादळामुळे नारळाच्या झाडांहून अधिक उंच लाटा थैमान घालताना दिसत आहेत.
- पश्चिम बंगाल : कोलकातामध्येही पाऊस सुरू आहे
- ‘यास’ चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटकचा तटीय भाग, , आणि बिहारच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.
- यास चक्रीवादळाच्या ‘लँडफॉल’पूर्वी (जमिनीला धडक) या वादळाचे परिणाम दिसून येऊ लागलेत. पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॅरकपूरमध्येही जोराच्या वाऱ्यांसोबत मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे.
- यास चक्रीवादळाचा परिणाम झारखंडवरही दिसून येतोय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज आणि उद्या झारखंडच्या काही भागांवर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times