मुंबई: मराठा समाजाला भाजपनं आरक्षण दिलं आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनंच केलं. त्यामुळं मराठा समाजाला सदैव फसविणाऱ्या काँग्रेस पक्षानं भाजपला छत्रपतींचा सन्मान कसा करायचा हे शिकवू नये’, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी केली आहे. (Pravin Darekar Taunts Congress Leader Sachin Sawant Over )

मराठा आरक्षणावर चर्चेसाठी वेळ मागूनही पंतप्रधान यांनी यांना वेळ दिली नाही. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते यांनी पंतप्रधान मोदी व भाजपवर जोरदार टीका केली होती. ‘कंगना राणावत व प्रियांका चोप्रा यांना भेटण्यासाठी पंतप्रधानांकडं वेळ आहे, पण संभाजीराजेंसाठी वेळ नाही. हा महाराष्ट्राचा अवमान आहे,’ असं ट्वीट सावंत यांनी काल केलं होतं. मोदी यांचे सेलिब्रिटींसोबतचे फोटोही त्यांनी ट्वीट केले होते. सावंंत यांच्या या टीकेला दरेकरांनी उत्तर दिलं आहे.

वाचा:

‘१९९९ पासून १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तर, दहा वर्षे केंद्रात सत्ता होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या ऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचं काम ह्या सरकारनं केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिलं व ते हायकोर्टातही टिकवलं. आमचं सरकार होतं, तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही त्याला स्थगिती आली नाही. हे सगळं होत असताना चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळं ज्यांना मराठा समाजाचं असलेलं आरक्षण टिकवता आलं नाही, त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चंद्रकांतदादांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. मराठा समाजाला कायदेशीर पद्धतीनं आरक्षण कसं द्यायचं आणि ते कोर्टात कसं टिकवायचं ते आम्हाला चांगलं समजतं. तुम्हाला जमलं तर आता किमान सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका तरी दाखल करा,’ असं दरेकर यांनी सुनावलं आहे.

वाचा:

‘केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपनं छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केलं. त्यापाठोपाठ प्रयागराज येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचं अभिनंदन केलं. काँग्रेसनं कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला हे आधी सचिन सावंत यांनी सांगावं. कधीतरी काँग्रेसकडून आमदारकी मिळेल या आशेवर असलेल्या सावंत यांनी उगाच उठाठेव करू नये,’ असा टोला दरेकर यांनी हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here