अहमदनगर: ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. हा दिवस जसजसा जवळ येत आहे, तशी यापुढे नेमके काय होणार? याची उत्सुकता वाढत आहे. यापुढे राज्यात सरसकट निर्बंध न राहता ग्रीन व रेड झोनप्रमाणे जिल्हानिहाय वेगळी बंधने असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले आहेत. तर, आता हे झोन सध्याच्या नव्हे तर ३१ मे नंतरची परिस्थिती पाहून ठरविले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री यांनी आज दिली.

मंत्री मुश्रीफ यांनी आज पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याचा दौरा केला. पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली. लंके यांच्या कामाचे कौतुक करून मुश्रीफ यांनी या कोविड केअर सेंटरसाठी दोन लाख रुपयांची देणगीही दिली. त्यानंतर त्यांनी पारनेर व श्रीगोंदा येथे आढावा बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वाचा:

त्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘करोनासंबंधी उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यांचे ग्रीन व रेड झोन तयार करण्यात आले आहेत. सध्या त्या नुसार उपाययोजना सुरू आहेत. मात्र, परिस्थतीत सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे ३१ मे नंतर पुढील निर्णय घेताना त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन हे झोन ठरविले जातील. आधीपासून रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगरसह अन्य जिल्ह्यांची परिस्थिती सुधारत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे,’ असे ते म्हणाले.

संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दलही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘तिसरी लाट आलीच तर ती भयानक असणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, आपण सर्वोतोपरी दक्षता घेऊन ती थोपविण्याचा प्रयत्न करायचा. याशिवाय येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला सामारे जाण्यासाठीही सज्ज राहायचे आहे. सरकार व प्रशासनाच्यावतीने तयारी केली आहे. या तिसर्‍या लाटेत शिर्डी व नगरमध्ये लोकांची सोय करण्याचे नियोजन आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही सुरू होत आहेत. ८० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. काळ्या बुरशीचा सामना करण्यासाठीही आपली आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

वाचा:

यावेळी लंके यांच्या कामाचे कौतूक करताना ते म्हणाले, ‘लोकांच्या कल्याणासाठी जीवावर उदार होऊन आमदार लंके यांनी लोकप्रतिनिधी काय काम करू शकतो, हे देशाला व महाराष्ट्रातला दाखवून दिले आहे. नगर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने या माझ्या शिष्याचा अभिमान मला व पक्षाला आहे.’

वाळूच्या जत्रेची दखल

लॉकडाउनच्या काळात सगळे व्यवहार बंद असताना श्रीगोंदा तालुक्यात वाळू उपसा जोरात सुरू आहे. त्यासाठी नदीपात्राला जत्रेचे स्वरूप येत आहे. करोनासंबंधीच्या नियमांचा भंग तेथे होत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. यावर ‘हा प्रकार गंभीर असून याची चौकशी केली जाईल. वाळू उपसा करणारे आणि त्यांना अभय देणारे जे कोणी असतली त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. कुकडीचे आवर्तन सुरू असून ते सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षात घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here