जळगाव: पवार-ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी आहे आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही, असे नमूद करत मुख्यमंत्री यांनी ‘आमचं बरं चाललंय’ असाच संदेश आज दिला.

जळगावमधील जैन हिल्स येथे आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला. शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, आता राज्यात तुमचे सरकार आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमुक्तीवरही मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला हमी दिली. कर्जमुक्तीची सुरुवात पुढील महिन्यात होईल. कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे. कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्याला कायमचं बाहेर काढणं हे आमचं लक्ष्य असून हे सरकार निश्चितच शेतकऱ्याला कर्जमुक्ती देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाला प्रतिभाताई पवार यांची उपस्थिती होती. त्यांचा उल्लेख करत माझ्या शपथविधीला प्रतिभाताई आल्या होत्या. त्यानंतर आज या कार्यक्रमाला त्या आल्या आहेत. त्यामुळेच ‘महाविकास आघाडीत अंतर पडलं’ असं उद्याच्या पेपरमध्ये पुन्हा छापून आलं तरी आमच्यामध्ये बळीराजा सपत्नीक आहे. शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. हेच खरं, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी यावेळी पाणीसमस्येवर बोट ठेवले. राज्यात मराठवाडा, खान्देश हा तहानलेला भाग असून केंद्र व राज्य सरकारने या समस्येवर मात करून प्रत्येक भागाला पाणी पोहोचेल अशा योजना आखाव्या, असे आवाहन पवार यांनी केले. देशाच्या प्रगतीत वैज्ञानिकांएवढेच योगदान काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे आहे, असे पवार म्हणाले.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here