सोलापूर : उजनी धरणातील पाण्याचं वाटप झालेलं असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी ५ टीएमसी पाणी पळविण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारमधील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने चालवला आहे. त्याला सोलापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे.

इतकंच नाही तर नुकतीच निवडणूक पार पडलेल्या मंगळवेढा तालुक्यातील ३५ गांव आजही उजनीच्या पाण्यापासून वंचित आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट हे तालुके उजनीच्या नियोजित पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळं उजनीच्या पाण्याचा संघर्ष तीव्र होत आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यात मिळेल त्या ठिकाणी सोबत येतील तेवढ्याच शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलनं होताना दिसत आहेत.

याचाच भाग म्हणून मंगळवेढा इथं आज रास्ता रोको करण्यात आला. हा संघर्ष लवकर निवळला नाही तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे असा सूचक इशारा या आंदोलकांनी दिला आहे. यावेळी ‘आमच्या उजणी धरणाचं पाणी पळवणाऱ्या पालकमंत्री आणि अजित पवारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी आंदोलकांकडून देण्यात आली आहे.

या आंदोलनस्थळी समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे सचिव माऊली भाऊ हळणवर दीपक भोसले उपाध्यक्ष अॅड बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे आप्पासाहेब मेटकरी, माऊली बंडगर शिवाजी टकले, धर्मा मरीआईवाले सचिन पांढरे, यल्लाप्पा पडवळे अक्षय देवकते, भागवत सोमुत्ते, राहुल टेकनर, विजय ताड आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here