अहमदनगर: राष्ट्रवादीचे आमदार यांनी कोविड केअर सेंटरमध्ये केलेल्या नृत्यावरून सुरू झालेली टीकाटिप्पणी थांबायला तयार नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता भाजपचे आमदार यांनीही पवार यांच्यावर टीका केली आहे. तर, पवार यांच्याकडून भातखळकरांना उत्तर देताना तन्मय फडणवीस यांनी नियम मोडून लसीकरण केल्याचा मुद्दा पुढे आणण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गायकवाडी येथील कोविड केअर सेंटरला पवार यांनी भेट दिली होती. तेव्हा तेथे मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये सहभागी होत पवार यांनी रुग्णांसमवेत थोडावेळ ठेका धरला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर दरेकर यांनी टीका केली होती. त्याला पवार यांनीही उत्तर दिले.

वाचा:

तोच धागा पकडून आता याच मुद्द्यावरून भातखळकर यांनीही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘कोविड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोविड सेंटरमध्ये रोहित पवार यांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत,’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

याला पवार यांच्याकडूनही उत्तर देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी जुन्या बातम्यांचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे २५ वर्षीय पुतणे तन्मय यांनी करोना प्रतिबंधक लस घेतल्याच्या त्या बातम्या आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेण्याची परवानगी मिळण्यापूर्वीच तन्मय यांनी लस घेतली होती. त्यावेळी नियम मोडून हे लसीकरण कसे करण्यात आले, यावरून वाद झाला होता. यासंबंधीच्या बातम्या शेअर करून पवार यांनी भातखळकरांना उद्देशून म्हटले आहे की, ‘नियमांची गोष्ट कोण करतंय? आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी. उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता? यामुळं स्वतःचेच जास्त वांधे होतील!’

वाचा:

एकूणच पवार यांच्या या नृत्यावरून त्यांच्यावर टीका करण्याची संधी भाजपच्या नेत्यांनी साधल्याचे दिसून येते. ठिकठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये असे कार्यक्रम यापूर्वीही अनेक ठिकाणी झाले आहेत. मात्र, पवार यांच्या सहभागामुळे गायकरवाडी येथील हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here