याप्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन एकास अटक केली आहे. ६ मे रोजी घडलेल्या या गंभीर घटनेची फिर्याद पीडित महिलेने २५ मे रोजी आर्णी पोलिस स्टेशनला दिली. फिर्यादी पीडित महिला ही ६ मे. रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान डेहणी शिवारातील एका शेतातून जात असताना आरोपी अमोल प्रल्हाद आठवले (वय ३९) याने सदर महिलेचा वाईट उद्देशाने पाठलाग करुन तिला खाली पाडले आणि जबरदस्तीने बलात्कार केला.
महिलेवर आरोपी बलात्कार करत असताना घटनास्थळी हजर असलेले आरोपी आकीब खाँ वाजीद खाँ (वय २०) व शेख आकीब उर्फ मोनु शेख इस्लामुद्दीन (वय १७) यांनी आपल्या मोबाइलमध्ये काढला. सदर व्हिडिओ शेख आकीब उर्फ मोनु शेख इस्लामुद्दीन याने फिर्यादीला तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही फिर्यादीवर बलात्कार केला आणि कोणाला काही सांगितले तर तुझा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
आरोपी आकीब खाँ वाजीद खाँ आणि शेख आकीब उर्फ मोनु शेख इस्लामुद्दीन यांनी २४ मे रोजी सदर व्हिडिओ व्हायरल केला, अशी फिर्याद पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले असून तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात अमोल आठवले याला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या घटनेबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times