नाशिक: आता मराठा आरक्षणासाठी कोणी एकाने पुढाकार न घेता सामुदायिक प्रयत्नांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन करावे असे आवाहन भाजप नेते यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांना केला आहे. सर्व संघटना एकत्र आल्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी देखील सामुदायिक नेतृत्वात सहभागी व्हावे, असे आवाहन विखे पाटील यांनी संभाजीराजेंना केले आहे. ( should participate in collective leadership appeals radhakrishna vikhe patil)

‘सामूहिक नेतृत्वात संभाजीराजेंनी सहभागी व्हावे’

मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी खासदार संभाजी महाराजांचं नेतृत्व मान्य आहे की नाही हा प्रश्न नाही. सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे, असे विखे म्हणाले. राज्यात एकूण ६ संघटना आरक्षणासाठी काम करत असून प्रत्येक संघटनेला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्या संघटना एकत्रितपणे भूमिका मांडत आहेत. संभाजी राजे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलेले आहे. मात्र सामूहिक नेतृत्वात संभाजी राजेंनीसुद्धा सहभागी झाले पाहिजे, अशी भूमिका विखे पाटील यांनी घेतली आहे.

संभाजी राजे मांडत असलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असून सगळ्या संघटना एकत्र आल्यानंतर संभाजी राजेंसुद्धा सहभागी व्हावे. संभाजी राजेंनी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना पाठिंबाच देऊ. संभाजी महाराजांनी पंतप्रधानांना वेळ मागितली की नाही हे माहिती नाही. त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही, असे विखे पुढे म्हणाले.

कोणच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, असे सांगतानाच राज्य सरकारकडून निष्काळजीपणा आणि वेळकाढूपणा करत असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. राज्यातील मंत्र्यांमध्ये देखील आरक्षणाबाबत विसंगती आढळून येत असून कोणी एकाने पुढाकार घेऊन नाही तर सामुदायिक प्रयत्नांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन करावे असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी आता केंद्र आणि राज्यावर दबावासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मात्र हे माझे व्यक्तिगत आवाहन असून भाजपाची भूमिका स्पष्ट झालेली आहे, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी आंदोलन झालीत. त्यामुळेच ही आंदोलने दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला. राज्य सरकारने या आंदोलनांना गंभीरपणे घेतले नाही. वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन करण्यापेक्षा एकाच व्यासपीठावर येण्याची गरज आहे. समाजाच्या प्रतीष्ठेचा मुद्दा तयार झालाय. राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी एकत्र या. आंदोलन, कायदेशीर लढाईसाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने वेळकाढूपणा केला. मंत्रिमंडळातील मंत्री वेगवेगळी भूमिका मांडत होते त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. राज्य आणि केंद्र सरकार बाबत एक दिलाने निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणासाठी समन्वय समिती देखील नेमली होती. मात्र तिचा उपयोग झाला नाही.

क्लिक करा आणि वाचा-
हा माझा राजकिय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न नाही. सर्वाना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करतोय. संभाजीराजेंनी जरी सर्वाना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला तरी मी त्यांच्या बरोबर राहीन, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर सतत आरोप केले आहेत. मात्र काँग्रेसचे अस्तित्वच आता संपलेले आहे. त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. त्यांचे मंत्री दुःखी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात कोणी विचारात नाही, असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here