गोंदिया : महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारी एक घटना समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नागालँडमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या एका सुपूत्राला वीरमरण आलं आहे. प्रमोद विनायक कापगते असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. प्रमोद हे मुळचे गोंदिया जिल्ह्यांचे आहे.

प्रमोद यांच्या जाण्याची बातमी कळल्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. प्रमोद विनायक कापगते हे गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडीचे आहेत. ते केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमोद हे भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कापगते यांचे सुपुत्र आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुळगावी प्रमोद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 2001 मध्ये प्रमोद हे सैन्य दलात रुजू झाले होते. ते सेवानिवृत्ती घेऊन या महिन्यात स्वगावी परत येणार होते पण त्याआधीच त्यांच्या जाण्याची बातमी हाती आल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here