मुंबई : जळगाव जिल्ह्यात भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कारण मुक्ताईनगरमधील ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांनी (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत () प्रवेश केला आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या या प्रवेश कार्यक्रमाला नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील उपस्थित होते.

विधानसभा मतदारसंघात खरंतर एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राहिला आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली महाविकास आघाडी आणि नंतर खडसे यांनी केलेला राष्ट्रवादी प्रवेश यामुळे या मतदारसंघातील गणिते बदलली आहेत. आता शिवसेनेनं मुक्ताईनगर नगरपालिकेतील भाजप नगरसेवकांना गळाला लावत पक्षाला आणखी बळकट केलं आहे.

कोणत्या नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन?
मुक्ताईनगर नगरपालिकेतील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य ४ जणांनी भाजपपासून फारकत घेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसंच ३ माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत दाखल होणं पसंत केलं आहे.

सत्ताबदलानंतर राजकीय गणितेही बदलली!
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही मोठे राजकीय बदल होत आहेत. अनेक महानगरपालिकांमधील भाजप नगरसेवकांनी पक्षापासून वेगळं होत महाविकास आघाडीकडे धाव घेतली आहे. सांगलीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला धक्का दिला होता. तसंच जळगाव महापालिकेतही कधीकाळी भाजपचे राज्यातील प्रमुख नेते राहिलेले आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला धोबीपछाड दिला होता. जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीत अनेक नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचा विजय झाला होता. त्यानंतर मुक्ताईनगर नगरपालिकेतील नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश हा भाजपसाठी आणखी एक धक्का ठरला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here