मुंबई: मातोश्रीत शांती यज्ञ करण्याचा सल्ला दिल्यानंतर भाजपचे खासदार यांच्यावर शिवसेनेने टीकेचे बाण चालवले आहेत. राणे पनवती आहेत आणि म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकले आहे, असा पलटवार शिवसेनेचे खासदार यांनी नारायण राणे यांच्यावर केला आहे. (shiv sena mp criticizes bjp mp )

खासदार राऊत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. भाजपने नारायण राणे यांना ते पनवती असल्याने त्यांना अडगळीत टाकलेले आहे. राणे यांना कावीळ झालेली आहे. ते अद्याप कोकणातही गेलेले नाहीत, असे सांगत भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर या करोनाच्या चाचणीसाठी जादा पैसे घेतले जात आहेत. नारायण राणे हे भूखंड हडप करणारे आहेत, अशी जोरदार टीका राऊत यांनी केली आहे.

आता राणेंची पोलखोल करणार

राणेंनी इतरांना सल्ला देण्याऐवजी आधी त्यांनी स्वत:च्या घरात शांती घालावी असा सल्ला देतानाच वर्षा आणि मातोश्री ही आमच्या दैवतांची घरे आहेत. त्यावर बोलणे राणे यांना शोभत नाही, असा जोरदार टोला राऊत यांनी राणे यांना लगावला आहे. आता आम्ही राणे यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असून सिंधुदुर्ग भवन कसे निर्माण झाले, तसेच कोकणातील लोकांची फसवणूक करून कशा प्रकारे भूखंड लाटण्यात आला हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, असे राऊत यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या वेळी राऊत यांना प्रसारमध्यामांच्या प्रतिनिधींनी पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये सुरू असलेल्या धुसपुसीबाबत विचारण्यात आले. मात्र यातून ज्येष्ठ नेते नक्कीच मार्ग काढतील असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थिर असून ते पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असे राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पंतप्रधान आणि राज्यापालांच्या टीकेवर नारायण राणे यांनी हल्लाबोल केला होता. त्यावर बोलताना राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, शांती यज्ञही करा, असे राणे यांनी म्हटले होते. त्यावर विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here