: करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसंच या संकटकाळात राज्य सरकारने अन्न-धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. अशातच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

मागील लॅाकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जून महिन्यात अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

यावेळी माहिती देताना छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे. त्याचबरोबर आता एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७१ लाख ५४ हजार ७३८ एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊन काळात गरगरीब नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेजही जाहीर केले होते. या पॅकेजनुसार रिक्षा चालकांसह इतर काही घटकांना थेट आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here