म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराष्ट्रातील करोना संबंधित घोषित निर्बंध एक जूनला संपुष्टात येत असून या दिवसापासून सर्वच व्यापार पूर्ण वेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहीजे अशी आग्रही मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. ( ask govt to allow all to start full time)

महाराष्ट्राच्या शेजारील विविध राज्यांत सर्व प्रकारचे व्यापार सुरू असल्याने यापुढे बंद राहील्यास महाराष्ट्रातील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भिती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. त्यामुळे एक जून नंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच अशी व्यापार्‍यांची आग्रही भूमिका असल्याने सरकारने आता दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका, नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या परवाना फी मध्ये एक वर्षाची माफी द्यावी, प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल व कर्जावरील व्याज माफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापार्‍यांसाठी जाहीर करावे अशी मागणी केल्याची माहीती ललित गांधी यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील बहुतांश दुकानदारांनी लसीकरण करून घेतले असुन उर्वरीत व्यापार्‍यांनी ही लवकरात लवकर स्वतःचे व कर्मचार्‍यांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व महाराष्ट्र चेंबर तर्फे करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही पाठवण्यात आल्या असून सरकाने त्वरीत निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here