म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लक्षद्वीपच्या नवनियुक्त प्रशासकांनी घेतलेल्या कथित वादग्रस्त धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात त्या भागातील खासदार पी. पी. मोहमंद फैझल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. (Sharad Pawar) यांनी यांचे बुधवारी लक्ष वेधले आहेत. (ncp president has written a letter to against the )

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्षद्वीप प्रशासनाच्या विरोधात पत्र लिहले आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी टि्वट करून माहिती दिली आहे. वास्तविक, लक्षद्वीपमध्ये प्राणी संरक्षण कायदा बनविला जात असून, यातून गोवंश हत्येवर बंदी घातली जाणार आहे. तर दुसऱ्या एका कायद्याद्वारे तेथे दारूचा व्यवसाय वाढविण्याची योजना आहे.

लक्षद्वीप हा बऱ्याच काळापासून मद्यपान न करणारा प्रदेश आहे. शिवाय तेथील बहुतांश लोक मांसाहारी आहेत. नव्या प्रस्तावित कायद्यामुळे त्याठिकाणच्या स्थानिक लोकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आहे. स्थानिक नेते प्रशासनाचा निषेध करीत असून, यात खा. मोहम्मद फैझल यांचा समावेश असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तेथील प्रशासन लोकांच्या खाण्याच्या परंपरा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवीन प्रशासक त्यांच्या मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे लक्षद्वीपांच्या परंपरेलाही ठेस पोहचत आहे, असे लक्षद्वीपचे खा. मोहम्मद फैझल यांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा-

करोनाच्या पहिल्या टप्प्यात लक्षद्वीपमध्ये एकही करोना रुग्ण आढळला नव्हता. तर दुसऱ्या लाटेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. यासाठी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना जबाबदार धरले जात असून, पटेल यांच्या कारभारावर लक्षद्वीपचे लोक संतप्त आहेत असे पवार यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
दिनेश्वर शर्मा यांच्या निधनानंतर गुजरातचे माजी आ. प्रफुल्ल पटेल यांची नवीन प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपमध्ये ९० टक्के जनता ही मुस्लिम आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here