: शहरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर शहर पोलिस ठाण्यातील डिबी पथकाने धाड टाकून १९ जणांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका जिममध्ये बुधवार, दि. २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

शहरातील आरटीओ कार्यालय परिसरातील एका जिममध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होता. याबाबतची माहिती यवतमाळ शहर पोलिस ठाण्यातील डिबी पथकाला मिळाली. त्यावरून बुधवारी सायंकाळच्या सुमारास पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी १९ जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आलं. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी १९ मोबाईल, एक दुचाकी, जुगार साहित्य आणि रोख असा एकूण दोन लाख ४४ हजार ८२० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सदर १९ जुगाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार प्रदिप शिरस्कर, सहाय्यक पोलिस निरिक्षक रामकृष्ण भाकडे, पथकातील महेश मांगुळकर, अंकुश फेंडर, मिलींद दरेकर, अमित मस्के यांनी पार पाडली.

कोण आहेत आरोपी?
सलीम शहा सुलेमान शहा वय ५० वर्ष, रा. अलकबीर नगर, राजेंद्र भिमरावजी गुल्हाणे वय ४८ वर्ष रा. सुकळी ता.बाभुळगाव, नरेंद्र रामनाथ यादव वय ६० वर्ष रा. चौसाळारोड बोदड, सलीम शहा गुलाब शहा वय ४० वर्ष रा. सुकळी ता.बाभुळगाव, आरीफ अहेमद सिद्दीक अहेमद वय ४२ वर्ष रा.कळंब चौक, आसिफ रहीम खान वय ६२ वर्ष रा. कळंब चौक, शेख युनुस शेख अब्दुल वय ५४ वर्ष रा. शादाब बाग, शेख एजाज शेख हबीब वय ३६ वर्ष रा. अलकबीर नगर, मोहम्मद जावेद शेख अहमद वय ५० वर्ष अलकबीर नगर, बबन चंपतराव भुसारे वय ५२ वर्ष रा. हातगाव जि. नांदेड, अमित वसंतराव नागभीडकर वय ४५ वर्ष रा. तारपूरा, सुमीत कैलास पेटकर वय ४२ वर्ष रा. पाटीपुरा, अब्दुल कयुम खान वय ४४ वर्ष रा. कुंभारपुरा, अशफाक खान मजीद खान वय ४९ वर्ष रा. कळंब चौक, शेख ईम्रान शेख जाफर वय ४१ वर्ष रा. बाबा नगर, गुलाब बाबुराव इंगळे वय ५५ वर्ष रा. जय भारत चौक, उमेश लक्ष्मण गुरखे वय ३५ वर्ष रा. जुना उमरसरा, अनिल शिवचंद चौहान वय ५० वर्ष रा. आसोला खुर्द ता. मानोरा, आणि झायेद शहाद तगाले वय ३५ वर्ष रा. गांधी चौक, यवतमाळ अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १९ जुगारींची नावे आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here