करोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालयांनी दिलेल्या ८१२५ वैद्यकीय बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करण्यात आले असून, या बिलांमध्ये आकारलेले सुमारे १२ कोटी ७६ लाख रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. ( of 12 crore 76 lakh rupees for in )
रुग्णालयांकडून जास्त रकमेची वैद्यकीय बिले आकारल्याच्या तक्रारी प्रशासनाने येत आहेत. त्यांचे पूर्व लेखापरीक्षण करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये उपआयुक्त, सनदी लेखापाल आणि डॉक्टरांचा समावेश आहे. या पथकांकडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करून रक्कम कमी करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत ८१२५ बिलांमधील सुमारे १२ कोटी ७६ लाख रुपये कमी झाले ओहत.
रुग्णालयांचे विद्युत लेखापरीक्षण सुरू
पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये विद्युत यंत्रणेवर ताण येऊन दुर्घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांकडून रुग्णालयांचे विद्युत लेखापरीक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या लेखापरीक्षणात आढळणाऱ्या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढल्यानंतर रुग्णालयांकडून विद्युत यंत्रणेचा वापर वाढतो. त्यामुळे विद्युत यंत्रणेवर ताण येऊन दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील रुग्णालयांमधील विद्युत यंत्रणा सुस्थितीत आहे का, याची तपासणी करण्यासाठी विद्युत लेखापरीक्षण करण्यात येत आहे. विद्युत लेखापरीक्षणाबरोबरच जिल्ह्यातील रुग्णालयांचे अग्निसुरक्षा आणि ऑक्सिजन वापराचे लेखापरीक्षणही केले जात आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पुण्यावरील पाणीकपातीचे संकट टळले
करोनाच्या काळात पाण्याचा वापर जास्त झाला असला, तरी धरण क्षेत्रात ऐन उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे यंदा पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये सुमारे नऊ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एक टीएमसी पाणी जास्त असल्याने पुण्यावरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सध्या जलसंपदा विभागाकडून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीसाठी दुसरे उन्हाळी आवर्तन घेण्यात येत आहे. त्यानुसार मुठा उजवा कालव्याद्वारे दहा जूनपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. दुसऱ्या उन्हाळी आवर्तनात साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनापैकी आतापर्यंत सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या नऊ टीएमसीपैकी दहा जूनपर्यंत शेतीसाठी सुमारे दीड टीएमसी पाणी सोडले, तरी पुण्यासाठी मुबलक पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times