सुभाष पाटील हे कलबुर्गी जवळ असलेल्या अफजलपूर येथील राहणारे. एमबीबीएसचं शिक्षण घेत असताना १९९७मधील एका हत्येप्रकरणी त्यांना २००२मध्ये शिक्षा झाली. यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. १४ वर्ष त्यांनी तुरुंगात काढली. डॉक्टर बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. तुरुंगात राहूनही त्यांनी जिद्द सोडली नाही. तुरुंगाच्या ओपीडीतही त्यांनी काम केलं. चांगल्या वर्तनामुळे त्यांची २०१६मध्ये मुक्तता करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुभाष पाटील यांनी २०१९मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते डॉक्टर झाले.
डॉक्टर बनण्याचे स्वप्न सोडले नाही
सुभाष पाटील यांनी याच महिन्यात एमबीबीएससाठी आवश्यक असलेली एक वर्षाची इंटर्नशीप पूर्ण केली. १९९७मधील हत्ये प्रकरणी पाटील यांना २००२मध्ये पोलिसांनी अटक केली होती. यावेळी पाटील हे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला होते. हत्ये प्रकरणी २००६मध्ये त्यांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तुरुंगात गेल्यावरी पाटील यांनी डॉक्टर बनण्याचे स्वप्न सोडले नाही. तुरुंगात ते चांगलं काम राहिले. चांगल्या वर्तणुकीमुळे तुरुंग प्रशासनाने १५ ऑगस्ट २०१६ त्यांची मुक्तता केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times