मुंबई : () रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाबाबत बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, भाजपने सत्तेत असताना तयार केलेला आरक्षण कायदा फूलप्रुफ नव्हता, असा पलटवार सत्ताधारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. अशातच आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून आणि आमने सामने ( Vs ) आले आहेत.

काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट करत मराठा आरक्षणावरून भाजपची पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सचिन सावंत यांचा समाचार घेतला आहे.

‘कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान संभाजीराजे छत्रपती यांना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रवीण दरेकर आणि भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू’, असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.

सचिन सावंत यांनी पोलखोल करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही जोरदार पलटवार केला आहे. ‘ज्यांच्यासाठी बाजू मांडताय त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात,’ असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

‘बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या. राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू,’ असं प्रतिआव्हानही प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसच्या सचिन सावंत यांना दिलं आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि भाजप मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमकपणे आमने-सामने आल्याने याबाबत आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here