वाचा:
औंध येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे सुरू करण्यात आले आहे. औंधसह खटाव तालुक्यातील रुग्णांसाठी हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील दीड महिन्यापासून हे कोविड सेंटर सुरळीत सुरू आहे मात्र, मंगळवारी रात्री उशिरा अचानक ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने सर्व यंत्रणा लगेचच सतर्क झाली. येथे उपचार घेत असलेल्या व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना कोणताही धोका पोहचू नये म्हणून तातडीने पावले उचलण्यात आली. ४० ते ६५ वयोगटातील १५ रुग्णांना वडूज व मायणी येथे हलविण्यात आले. यापैकी दहा रुग्णांवर वडूज येथे तर पाच रुग्णांवर मायणी येथे सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
वाचा:
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार किरण जमदाडे यांनी त्वरित याठिकाणच्या ऑक्सिजन यंत्रणेची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यानंतर बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून याठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर ,पाइपलाइन दुरूस्ती तसेच रुग्णालयातील प्रत्येक बेडला जोडलेल्या ऑक्सिजन यंत्रणेची पाहणी व दुरुस्तीचे काम सुरू होते. तहसीलदारांसह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माने, डॉ. संतोष मोरे, डॉ. सम्राट भादुले व वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्ण सुखरूप असल्याची माहिती डॉ. विलास साळुंखे यांनी दिली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times