दरवर्षी याच काळावधीत मासेमारी बंद ठेवण्यात येते. एकतर हा मशांच्या प्रजननाचा काळ असतो, तसेच जून आणि जुलै या दोन महिन्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे यामुळे समुद्रात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या कालावधीत शासन हा निर्णय घेत असते. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. करोनामुळे मच्छिमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून हे लक्षात घेत यावेळी मासेमारी १५ दिवसांनंतर बंद करावी अशी मच्छिमारांची मागणी आहे.
वर्षभराच्या काळात योग्य प्रमाणात मासे उपलब्ध होऊ शकले नाहीत. यामुळे मच्छिमारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या बरोबरच तौक्ते चक्रीवादळामुळे काही दिवसांसाठी मासेमारी बंदच ठेवण्यात आली होती. यात सुमारे १० दिवस वाया गेल्याचे सांगतात. हेच लक्षात घेऊन शासनाने मच्छिमारांचा विचार करून अधिक १५ दिवस मासेमारी करण्याची परवानगी द्यावी असे मच्छिमारांचे म्हणणे आहे. आपल्या मागण्यांचे निवेदनही आम्ही सरकार दिले असल्याचे मच्छिमार सांगतात.
क्लिक करा आणि वाचा-
मच्छिमार कृती समितीचा मात्र विरोध
मच्छिमारांच्या या मागणीला मच्छिमार कृती समितीने मात्र विरोध केला आहे. जूनमध्ये मासेमारी सुरू ठेवणे हे मच्छिमारांसाठी धोकादायक ठरू शकते असे मच्छिमार कृती समितीला वाटते. एखादे संकट ओढवले तर त्याला जबाबदार कोणाला धरणार, असा सवाल समितीने केला आहे. याचा विचार करून मच्छीमारांनी आपल्या मागणीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी के ली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times